उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्ह्यात श्री. क्षेत्र तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी देवींची शारदीय नवरात्र महोत्सव यात्रा दि.17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2022 या कालाधीत मोठ्या प्रमाणात यात्रा भरणार आहे. यात्रेमध्ये यात्रेकरुंना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उपचारात्मक  आणि प्रतिबंधात्मक सेवा देण्यात येत आहे. तरी यात्रेकरुंनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जि.प.चे आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके आणि जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.डी.के.पाटील यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

 यात्रा कालावधीत तात्काळ आरोग्य सेवा देण्यासाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णवाहिका संदर्भीय आरोग्य सेवा देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत तुळजापूर शहरात श्री. तुळजाभवानी देवी मंदिर, एस.टी. स्टँड समोर, शिवाजी पुतळ्याजवळ, घाटशिळ, वाहनतळ आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र ठेवण्यात आली आहेत. तसेच दोन 108 रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत आणि प्रथमोपचार केंद्र सुरु केले आहेत. या प्रथमोपचार केंद्रात पुरेशा प्रमाणात औषधीसाठा उपलब्ध केलेला आहे. तरी प्रथमोपचार केंद्रात यात्रेकरुंना आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.

 श्री. क्षेत्र तुळजापूर येथे पायी येणाऱ्या यात्रेकरुंसाठी ग्रामीण भागात 19 ठिकाणी प्रथमोपचार केंद्र चालू करण्यात आली आहेत. यात्रा मार्गावर वडगाव, पाटोदा मोड, आष्टामोड, माकणी, तामलवाडी, कसई, माळूंब्रा, बोरी, तीर्थ(बु.), देवसिंगा, ताकविकी, काक्रंबा, तुरोरी, येणेगुर, तलमोड, नळदुर्ग, जळकोट, लोहारा आणि नारंगवाडी या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहेत.

 शहरात उपाययोजनेसाठी 10 आरोग्य पथके तयार केली आहेत. या पथकास गल्ली, वार्डाचे वाटप करुन या भागातील सर्व पाणी साठ्याचे हॉटेल, धाबे, खाणावळ येथील पाण्याचे निर्जंतुकीकरण करुन पाणी शुध्दीकरण झाल्याची खात्री ओ.टी.टेस्ट घेऊन करण्यात येते. ओ.टी.टेस्ट निगेटीव्ह आल्यास मदर सोल्युशन किंवा मेडीक्लोरद्वारे पाणी साठ्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते.

 
Top