उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ग्रंथालयाच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचा व विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढवा यासाठी ग्रंथालयातील फलकावर दररोज नवीन दोन शब्द लिहून तो फलक ग्रंथालयाच्या बाहेर बाजूस ठेवला जातो.या उपक्रमाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी कौतुक करून या उपक्रमाचे उद्घाटन झाले असे जाहीर केले. विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडवण्यासाठी या अभिनव उपक्रमाचा नक्कीच उपयोग होईल असे ते यावेळी म्हणाले. पुस्तके ही व्यक्तीचे निस्वार्थी मित्र असतात,पुस्तके व्यक्तीचे भविष्य उज्वल करण्यासाठी मदत करतात,यासाठी जास्तीत जास्त ग्रंथालयातील पुस्तकांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे प्राचार्य डॉ . जयसिंगराव देशमुख म्हणाले,

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. मदनसिंग गोलवाल यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.   सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला .

 
Top