उस्मानाबाद / प्रतिनिधी-

माजी मंत्री आ. अमित देशमुख आरोग्यमंत्री डाँ तानाजी सावंत यांच्या न्यायालयीन कुरघोडी मध्ये तेरणा सहकारी साखर कारखाना अडकलाय. या कुरघोडीमुळे सभासदाचे भविष्य पुन्हा अंधार मय झाले आहे.तेरणा कारखाना पुन्हा चालु करावा न्यायालयीन प्रक्रिया मध्ये हा कारखाना अडकाऊ नका.या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड अजित खोत यांच्या नेतृत्वात आज बाभळगाव येथील आ.अमित देशमुख यांच्या घरा समोर आंदोलन होते हे आंदोलन करण्या पुर्वीच बाभळगावच्या वेशीवर पोलीसांनी आंदोलनकर्त्या आडवले.

 उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या १२ वर्षापासून बंद आहे. तो सुरू करण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पडली. मात्र या टेंडर प्रक्रियेवरून भैरवनाथ शुगर व ट्वेंटीवन शुगर यांच्यामध्ये म्हणजेच आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत व माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या २ संस्थेमध्ये वाद निर्माण झाला आहे. न्यायालयात प्रलंबित असून या बाबत ट्वेंटीवन शुगरचे आ. देशमुख व भैरवनाथ शुगरचे मंत्री डॉ सावंत यांनी न्यायालयाबाहेर आपसात तडजोड करावी व हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करावा. तसेच न्यायालयीन कुरघुड्या बंद करा व तेरणा सुरु करा या एकमेव मागणीसाठी आम आदमी पार्टीच्यावतीने आ. देशमुख यांच्या लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील गढीसमोर दि.२२ सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीचे राज्य समिती सदस्य ऍड. अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आंदोलकांना बाबळगाव फाट्यावरच पोलिसांनी अडवुन  त्यांची रवानगी पोलिस ठाण्यात केली. तर प्रशासनाच्या माध्यमातून हे आंदोलन चिरडून काढले. दरम्यान, आम्हाला याबाबत आश्वासन दिल्याशिवाय पोलिस ठाण्यातून जाणारच नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यानी घेतली असता ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष यांनी पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, युवक जिल्हाध्यक्ष आकाश कावळे, जिल्हा सचिव मुन्ना शेख, कोषाध्यक्ष विकास वाघमारे, लातूरचे जिल्हाप्रमुख प्रताप भोसले, लातूर जिल्हाध्यक्ष सचिन औरंगे,  लातूर जिल्हा सचिव कुमार खोत, लातूर शहर युवा अध्यक्ष माने, लातूर ग्रामीण अध्यक्ष सतीश कारंडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top