लोहारा/प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशिची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळ लोहारा तालुका यांच्यावतीने तहसीलदार संतोष रुईकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की,सेलू जि.परभणी येथील अल्पवयीन (वय वर्ष 11) मुलीला व तीच्या मावस भावाला सेलू येथुन अपहरण करून बोरी ता.जिंतूर परभणी येथे दोन नराधमांनी आणले व मुलाला कौसडी फाटा बोरी येथे सोडून देऊन मुलीला कोक शिवारात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पसार झाले.सदर घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे.सदर घटनेने नामिक समाजातच नव्हे तर सर्व समाजातील जनतेमध्ये संताप निर्माण झाला आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीवर कठोर कार्यवाही करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी,अशी सर्व समाजातून मागणी होत आहे

 या निवेदना वर नगरसेवक विजयकुमार ढगे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,पत्रकार यशवंत भुसारे, कमलाकर माने,गोविंद माने, दत्तात्रय माने,गोविंद भुसारे दिनकर माने,कल्याण ढगे, अमोल फरीदाबादकर,दयानंद फरीदाबादकर,जितेश फुलकुरते,महादेव लोखंडे, गोपाळ सुरवसे,सुरेश गायकवाड,अंकुश दुधाळ, धनराज फरीदाबादकर,महेश फरीदाबादकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top