उमरगा / प्रतिनिधी-

तालुक्यातील एकुरगा येथील मोलमजुरी करून खाणाऱ्या कुटुंबातील मुलींनें प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेऊन नीटच्या परीक्षेत ६०१ गुण मिळवून उज्वल यश संपादन केल्याने आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना जनतेतून व्यक्त केली जात आहे.

शाळेतील शिक्षकांच्या आध्यापणावर मुस्कान हिने दहावीत ९७.६० टक्के गुण मिळवून उज्वल यश मिळविले या यशाच्या जोरावर तिचा लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात तिला११ वित प्रवेश मिळाला ११वी,१२वीत गुरुजनाकडून मिळालेले मार्गदर्शन तिच्या यशाला कारणीभूत ठरले नुकत्याच नीट च्या परीक्षेत तिला ६०१ गुण मिळाल्याने अंत्यत गरीब कुटुंबातील मुलीने हे यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.मुस्कान हिचा मोठा भाऊ हा पण खाजगी गाडी वर वाहन चालक म्हणून काम करीत आहे तिर तिची छोटी बहीण सानिया ही११वित शिक्षण घेत आहे तर महेक ही बहीण गावातील शाळेत ९ वित शिक्षण घेत आहे.घरची हलाखीची परिस्थिती कोणीही नोकरीस नाही त्यातच कसला शैक्षणिक वारसा नाही त्यामुळे तिने मिळविलेले यश इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.मुस्कान च्या यशाबद्दल उमरगा येथील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष खाजा मुजावर, यांनी कार्यकर्त्यांनां सोबत घेऊन सोमवारी (दि१२) रोजी मुस्कान यांच्या घरी जाऊन तिचा आणि तिच्या आई वडिलांचा सत्कार केला या वेळी मरकज मस्जिद कमिटीचे अध्यक्ष कलीम पठाण , उपाध्यक्ष मदनशा मुरशद , जाहेद मुल्ला, प्रशांत औरादे, उमा पाटील, राजेंद्र कुन्हाळे, व्यंकट वाघमोडे , मुलीचे वडील अफसर मुर्शद, आई अमिनाबी मुर्शदआदी उपस्थित होते.


 
Top