उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने दिनांक 14 सप्टेंबर 2022  रोजी हिंदी दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

  यावेळी सर्वप्रथम संत कबीर साहित्य सम्राट मुंशी प्रेमचंद आणि शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. श्रीराम नागरगोजे यांनी हिंदी दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले यावेळी ते म्हणाले की 14 सप्टेंबर 1949 पासून हा दिवस साजरा केला जातो. हिंदी विषयाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदी ही राष्ट्रीय भाषा असुन तिचा आदर आपण राखणे गरजेचे आहे.

   या कार्यक्रमाचे आभार डॉ. केशव क्षीरसागर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी  हिंदी विभागातील डॉ.माधुरी सोनटक्के प्रा. मोहन राठोड प्रा.वृषाली गावीत व महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.


 
Top