तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील कार्ला येथे कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या कारणावरुन  शिवीगाळ करुन पित्याने आपल्या बावीस वर्षिय  मुलीवर पिस्तूल ने गोळी झाडल्याने ती गंभीर जखमी  झाली असता उपचारार्थ उस्मानाबाद  येथे नेताना मरण पावली. ही घटना रविवार दि. १८रोजी राञी पाच वाजता  घडली.

 तुळजापूर  तालुक्यातील कार्ला येथील - गणेश झंपण भोसले व मिराबाई गणेश भोसले या नवरा बायकोने  रविवार  दि .१८ रोजी पाच  वाजता कार्ला येथे त्यांची मुलगी- काजल मनोज शिंदे ( वय २२ वर्षे ) हिस कुत्र्याने मटन खाल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन पिता- गणेश भोसले याने काजलवर रिव्हाल्वर मधून गोळी झाडून  तीला गंभीर जखमी केले .  काजल हिचे नातेवाईक- विशाल जयराम भोसले यांनी काजल हिस जिल्हा रुग्णालय , उस्मानाबाद येथे घेउन जात असताना काजल ही मयत झाली . तसेच गणेश भोसले व मिराबाई भोसले या दोघांनी मनोज सुनिल शिंदे ,( रा . कार्ला )यांसही ठार मारण्याची धमकी दिली .  मनोज सुनिल शिंदे यांनी सोमवार  दि . १ ९  रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम ३०२ ,  ५०४ , ५०६ , ३४ अंतर्गत नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.


 
Top