तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर व महाराष्ट्राचा विकास  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीखाली  करावयाचा असल्याने पक्ष संघटन वाढवा . या कामी मी तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही पालकमंञी तथा आरोग्यमंञी तानाजी सावंत यांनी  पक्ष प्रवेश सोहळ्यात दिली. 

 पालकमंञी तानाजी सावंत मंञी झाल्यानंतर त्यांचा देवीदर्शन दौरा दोन वेळा जाहीर झाला पण एकवेळेस ते येवु शकले नाहीत तर दुसऱ्या वेळी राञी उशीरा आल्याने मंदीर बंद झाल्याने त्यांना मंदीरात जावुन देवीदर्शन घेता आले नाही

माञ शनिवारी राञी शारदीय नवराञ उत्सव पुर्वीची मंचकीनिद्रा सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जवळपास अर्धा दिवस तिर्थक्षेञ तुळजापूरात कार्यक्रम ठेवुन देवीदर्शन घेतले.दुपारी धाराशिव येथुन तिर्थक्षेञ तुळजापूरला आगमन होताच थेट श्रीतुळजाभवानी मंदीरात जावुन दर्शन घेतले नंतर देविंजींच्या मंचकीनिद्रा तयारी पाहली. यावेळी त्यांनी देविजींचा शेजनिद्रेसाठी तयार करण्यात येणाऱ्या पलंग बाबतीत मानकरी तथा शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष  संभाजी पलंगे यांच्या कडुन माहीती घेवुन पलंगाचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन पेनुरे, सुरज सांळुके, दत्ता सांळुके, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, तालुकाध्यक्ष संभाजी पलंगे,  धनंजय पाटील आदी उपस्थितीत होते . 

 हजारो युवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश !

धाराशिव जिल्हयाचे पालकमंञी तथा  आरोग्य मंञी तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शनिवार दि. १७रोजी धाराशिव रोडवरील  शिवसेना तालुका कार्यालयात शहरासह अनेक गावातील युवकांनी शिवसेना शिंदे गटात तालुकाध्यक्ष संभाजी पलंगे यांच्या मार्गदर्शनखाली प्रवेश  केला .

यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन पेनुरे, सुरज सांळुके,  दत्ता सांळुके, धनंजय पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत  तुळजापूर शहर तुळजापूर खुर्द मोर्डा काक्रंबावाडी येथील युवकांचा गळ्यात भगवा गमजा घालुन   शिवसेना नेते  पालकमंञी तथा आरोग्यमंञी तानाजी सावंत यांच्या हस्ते  प्रवेश दिला.


 
Top