तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी देविजींचे शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये मंगळवार दि.४ रोजी दुपारी 12 वाजता होमाकुंडावर होणाऱ्या धार्मिक विधीसाठी  श्री जीवन मोहनराव वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 श्री तुळजाभवानी देविजींचे शारदीय नवरात्र महोत्सव  दिनांक 17 सप्टेंबर  ते दि.11 आँक्टोबर  या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या महोत्सवात मागील रूढी परंपरेनुसार   दि . 4/10/2022 वार मंगळवार रोजी दुपारी 12.00 वाजता होमावर धार्मिक विधीचा कार्यक्रम सोहळा होणार आहे . त्या अनुषंगाने  प्रतिवर्षाप्रमाणे   होमावर धार्मिक विधीचा कार्यक्रमासाठी   श्री जिवन मोहनराव वाघमारे यांची नियुक्ती केली आहे त्यांनी  नमुद धार्मिक विधीच्या कार्यक्रमासाठी उपस्थीत राहून अनुपालन अहवाल सादर करावा. अनुपालन अहवाल सादर न केल्यास नियमानुसार कारवाई अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे नियुक्ती पञात म्हटले आहे.


 
Top