लोहारा/प्रतिनिधी

कृष्णा-मराठवाडा प्रकल्पास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा कृष्णा खो-यातील उस्मानाबाद जिल्हयातील अवर्षणप्रवण दुष्काळी भागातील जनतेसाठी वरदान ठरणारा एक महत्वकांक्षी प्रकल्प असून प्रकल्पाची कामे सन 2007 पासून सुरु आहेत. तथापि सदर कामास अपेक्षीत गती नसुन सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळणेसाठी तात्काळ खालील प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कायम दुष्काळी आठ तालुक्यातील 90 गावांमधील 87188 हेक्टर क्षेत्रास एकुण 23.66 अ.घ.फु. पैकी उस्मानाबाद जिल्हासाठी 17.98 अ.घ.फु.पाणी उपलब्ध होऊन गावे सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे.सदर प्रकल्पाची कामे सन-2007 पासुन सुरु आहेत.सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना क्र.1 व 2 ची कामे प्रगतीपथावर आहेत.तथापि, सदर कामास अपेक्षित गती नसून सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळणेसाठी तात्काळ खालील प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे.प्रकल्पाचे द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रक हे मागील युती सरकारच्या काळात ऑगस्ट 2019 रोजी तयार झालेले असुन त्याची तपासणी ही त्याच वेळी राज्य तांत्रीक सल्लागार समिती यांचे कडुन झालेली असून,मागील युती सरकारच्या काळात नियोजीत अखेरच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही झाली नाही. तथापि अद्याप पर्यंत द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता न मिळाल्यास त्याचा परिणाम प्रकल्पाच्या गतीवर होऊन प्रकल्पाच्या पुर्णत्व हे नियोजनानुसार होणे शक्य होणार नाही. पुढील दोन वर्षात प्रकल्प पुर्ण करणे शक्य आहे, त्यानुषंगाने आपले स्तरावरुन कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास व्दितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणेची कार्यवाही तात्काळ करणे बाबत व प्रकल्पासाठी उर्वरीत 16.66 अ.घ.फु. पाणी उपलब्ध करुन देणे बाबत आपले स्तरावरुन संबंधीतास निर्देश व्हावेत.मराठवाडयातील कृष्णा खो-याचा भूभाग असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील 8 ही तालुके ज्यामध्ये माझ्या मतदारसंघातील उमरगा व लोहारा तालुके आहेत.अशा दुष्काळगृस्त व आवर्षणप्रवण भागास सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या भागातील सर्व लोकप्रतिनीधी यांची आग्रही मागणी असुन गेल्या अनेक वर्षापासुन कृष्णा मराठवाडा प्रकल्प पुर्ण करणे व त्याचा लाभ शक्य झालेला नसल्याने आता प्रकल्प पुर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.त्या अनुषंगाने आपले स्तरावरुन कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या द्वितीय सुधारीत प्रशासकीय व्दितीय प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मान्यतेची कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


 
Top