परंडा / प्रतिनिधी-

तालुक्यातील खासापूरी धरण चांदणी धरण तसेच आता पांढरेवाडी येथील निम्न खैरी प्रकल्प रविवार सायंकाळी १००% तुडूंब भरून सांडव्यावरून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

 गेल्या काही दिवसातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील सर्वच धरणात पाणी साठा मोठ्याप्रमाणात झाला आहे.यावर्षी अगदी ऑगस्ट  पासून समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्व नदी,नाले,ओढे, विहिरी,तलाव पाण्याने भरलेले आहेत.

पांढरेवाडी येथील प्रकल्पात सुमारे १०.५६ दशलक्ष घन मी इतका पाणी साठा झाला आहे. याचा लाभ पांढरेवाडी,चिंचपूर बु. ,माणिकनगर, शेळगाव, सक्करवाडी, लंगोटवाडी या गावांना मोठ्याप्रमाणात होत आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत आहे. या प्रकल्पातील पाणी साठा पाहण्यासाठी परिसरातील नागरीक गर्दी करत आहेत. यामुळे एखाध्या पर्यटनस्थळाचे स्वरूप आले आहे तसेच धरण भरल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.


 
Top