लोहारा/प्रतिनिधी

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी लोहारा शहरातील माजी नगरसेवक श्रीनिवास माळी यांची निवड राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे.श्रीनिवास माळी यांचे निसर्गा प्रती केलेले काम,तसेच परिसरातील एक चांगले सर्पमित्र या नात्याने त्यांचे काम उल्लेखनीय आहे . या निवडी बाबत लोहारा तालुक्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ यांच्या वतीने शिर्डी येथे दि.28, 29 आणि 30 ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच शिर्डी संस्थांच्या कार्यकारी अधिकारी मंडळाच्या सहकार्याने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.पर्यावरण प्रेमी साठी,निसर्गासाठी आपण काय करू शकतो,तापमान वाढ घनकचरा व प्लास्टिक निर्मूलन वने व पर्यावरण रक्षण जल व्यवस्थापन,ऊर्जा बचत पाण्याचा दुष्काळ व उपाय योजना,जंगलातील वनवे रोखणे आदी मुद्द्यावर या संमेलनात तज्ञ व्यक्ती कडून मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय संस्थेच्या वतीने पर्यावरण रक्षणाबाबत केलेल्या ठरावांचा आढावा घेण्यात येणार आहे.याच संमेलनात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या शेतकरी कार्बन क्रेडिट या विषयावर देखील चर्चा होणार आहे.तीन दिवसीय अधिवेशन काळात परिसर अभ्यास सौर ऊर्जा प्रकल्प पाहणी दूषित पाणी शुद्धीकरण प्रकल्प पाहणी करण्यात येणार आहे या संमेलनात सर्व पर्यावरण प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य सल्लागार दत्ताजी जावळे पाटील व जिल्हाध्यक्ष राज्य आदर्श शिक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी केले आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी 86O5885724 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 
Top