उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने भित्तिपत्रिकेचे  अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.सदर भित्तिपत्रिका मराठवाडा मुक्ती संग्राम दिनावर आधारित होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डी. एम.शिंदे यांनी केले. प्रस्ताविकात शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम व स्वातंत्र्य सैनिकांनी केलेली कामगिरी यांचा सविस्तर आढावा घेतला.

 याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी समाजशास्त्र विभागाचे कौतुक केले आणि उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले की, मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेकांचे योगदान महत्त्वाचे आहे.स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागातून व बलिदानातून मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला याची आठवण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कायम स्मरणात ठेवली पाहिजे.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा.माधव उगिले यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. 


 
Top