उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात निसर्गरम्य वातावरणात स्वातंत्र्यवीर व त्यांच्या वारसांचा सन्मान सोहळा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

 यामध्ये स्वातंत्र्य सैनिक रामभाऊ रघुनाथ जाधव यांचे पुत्र अण्णासाहेब जाधव, स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव, स्वातंत्र्य सैनिक लालासाहेब वाघमारे यांचे पुतणे दगडूशंकर वाघमारे, स्वातंत्र्य सैनिक गणपतराव देशमुख यांचे पुत्र जयसिंगराव देशमुख, स्वातंत्र्य सैनिक मनोहरराव टापरे यांचे सुपुत्र प्रवीण टापरे, स्वातंत्र्य सैनिक नरसिंगराव देशमुख यांचे पुत्र ॲड.अविनाश देशमुख, स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव पाटील यांचे पुत्र पांडुरंग पाटील, शरणाप्पा वाले यांचे नातु शिवशंकर वाले, हुतात्मा मुरलीधरराव देशमुख यांचे पुतणे प्रविण देशमुख, स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव डांगे यांचे पुत्र प्रमोद डांगे, स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र देशमुख यांचे पुत्र उमाजी देशमुख, हुतात्मा निल्लप्पा स्वामी यांचे पुत्र बाबुराव स्वामी गुरुजी अशा १२ जणांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

 यावेळी  इतिहासतज्ञ डॉ. सतिशजी कदम यांनी  मराठवाडा मुक्तीसंग्रामाची ऐतेहासिक माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली. सदरील सन्मान सोहळयासाठी संतोष  बोबडे, विक्रम देशमुख, ॲड.दिपक आलुरे, नय्यर जागीरदार, नेताजी पाटील, भिवा इंगोले, सुशांत भुमकर, आनंद कंदले, धनंजय रणदिवे, मनोगत  शिनगारे, तुळजापुर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. नितीन भोसले यांनी केले. आभार प्रदर्शन  नेताजी पाटील यांनी केले.


 
Top