उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या वतीने साजरा केला जाणारा श्री तुळजाभवानी देविजिचा शारदीय  नवरात्र मोहोत्सव  २०२२  हा दि. १७ सप्टेंबर २०२२ ते दि. ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. या कालावधीमध्ये दि.२६ सप्टेंबर २०२२ ते दि.११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील भाविकासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यातील भाविक हे लाखोंच्या संख्येने येत असतात सदर भाविकांना स्वच्छ, सकस, निर्भेळ अन्न पदार्थ मिळण्यासाठी तुळजापूर शहरातील सर्व हॉटेल  व्यवसायिक, स्विट मार्ट, नमकीन/फराळ उत्पादक व विक्रेते, खवा व पेढा विक्रेते, किरकोळ व घाऊक अन्न व्यवसायिक,  फळ विक्रेते, यांना   अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीत नमूद  बाबींचे योग्य पालन करून व्यवसाय करावा.

 नोदणी परवाना प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावलेले आसावे, अन्न पदार्थ बनविण्याची जागा स्वच्छ, रंगरंगोटी केलेली असावी, अन्न पदार्थ हताळणाऱ्यांची वैधकीय तपासणी केलेली असावी व वैयक्तीक स्वच्छतेची काळजी घ्यावी, कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी बिले ठेवावेत, तयार अन्न पदार्थ झाकूण ठेवावेत, झाकणयुक्त कचरा पेटीची सोय असावी, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, अन्न पदार्थ कोणत्या तेल/वनस्पतीमध्ये तयार केले जाते याचा उल्लेख दर्शनी भागावर करावे. किचनमधील खिडक्यांना बारीक जाळी बसविलेली असावी, किचनमध्ये जाळी जळमटे साफ केलेली असावी, अन्न पदार्थ तयार करण्याकरिता वापरण्यात येणारे खाद्य तेल जास्तीत जास्त तीन वेळेस वापरण्यात यावे. खाद्य तेलाची टीपीसी रिडींग २५ पेक्षा जास्त नसावी, मिठाई विक्रेत्यांनी मिठाईच्या ट्रे किंवा कंटेनर वर बेस्ट बिफोर दिनांक टाकणे बंधनकारक आहे. तसेच मिठाई  व्यवसायीकांना नोटीस बोर्डवर मिठाईचे स्वरूप (घटकपदार्थ) प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

 अन्न व औषध प्रशासनातर्फे सर्व अन्न व्यवसायीकांनी या तरतुदीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. जे व्यावसायिक पालन करणार नाहीत त्यांच्यावर उचित कायदेशीर कारवाही करण्यासाठी उस्मानाबाद कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी  न.त.मुजावर यांची नोडल अधिकारी व  उमेश कावळे, सतीश हाके,ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, संतोष कनकावाड अन्न सुरक्षा अधिकारी,नांदेड  व अरुण तम्मडवार, सुनील जिंतूरकर, प्रकाश कचवे अन्न सुरक्षा अधिकारी,परभणी विठ्ठल लोंढे अन्न सुरक्षा अधिकारी,  लातूर यांची  भरारी पथकामध्ये  नेमणूक करण्यात आलेली आहे.

 अशा प्रकारे ग्राहकांना स्वच्छ व सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व अन्न व्यावसायिकांना दिलेल्या सूचनांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शि.बा.कोडगिरे यांनी केले आहे.


 
Top