उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सुचने  नुसार संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून दि.26  सप्टेंबर  2022 पासून 18 वर्षांवरील सर्व महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित”  हे अभियान राबविण्यात येणार आहे. तेंव्हा सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अति.जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके यांनी केले आहे.
 या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा सर्व शासकीय आरोग्य संस्थामधून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  तसेच सुरक्षित आणि सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिला व बाळ विकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा ताई यांच्या मार्फत घरोघरी जाऊन अभियान आणि उपलब्ध सुविधेबाबत माहिती देणार आहेत. तसेच ग्रामसभा आणि स्थानिक पातळीवर सभांचे नियोजन करण्यात येणार आहे.  यामध्ये जिल्हा रुग्णालय अंतर्गत विशेष मेडिकल व डेंटल शिबिरांचे आयोजन करण्यात येणार  आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत दररोज माता आणि महिलांच्या तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून उपचार  शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे आरोग्य उपकेंद्र आणि आरोग्य वर्धिनी केंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत या मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रताय्क्ष भेटी देऊन 18 वर्षांवरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा   तसेच सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आवश्यकते नुसार संदर्भित ही करण्यात येणार आहे. 

 
Top