तुळजापूर  / प्रतिनिधी- 
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता गद्दारांना धडा शिकविण्यासाठी  निवडणुकीची वाट बघते आहे.  या संकटाला संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पहा या संघर्ष काळात जो सेने सोबत आहेत त्यांना त्यांच्या  निष्ठेचे फळ  सेना निश्चित देईल,अशी ग्वाही युवा सेनेचे सरचिटणीस वरुन देसाई यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरात युवा सेनेच्या मेळाव्यात केले.
 यावेळी व्यासपीठावर  संपर्कप्रमुख अनिल  खोचरे, खा.ओमप्रकाश  राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास  पाटील, विभागीय सचिव नगरसेवक अक्षय ढोबळे,  विजयकुमार सस्ते, युवा सेना  मनिषा वाघमारे, चेतन बोराडे,  शामल ताई वडणे,  चेतन नाईक,  बालाजी सांगळे,  मयूर पांचाळ,  शरद कोळी, शाम  पवार,राज अहमद पठाण, सुधीर कदम,  प्रतीक रोचकरी, कमलाकर  चव्हाण, बाळकृष्ण पाटील, रोहित नागनाथराव चव्हाण,सुनील जाधव,प्रदीप  मगर, चेतन बंडगर, सुनील कदम, संतोष भाऊ पुदाले, सागर इंगळे, पिनू भोसले, अर्जुन साळुंखे, अभिषेक कदम, उमेश जाधव, ढोले नाना, संजय भोसले, सरदार सिंह ठाकूर, मेजर जाधव  , सुनिल कदम आदीं उपस्थित होते.
यावेळी  बोलताना देसाई पुढे  म्हणाले की, महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेने स्वराज्य निर्मीतीसाठी  छञपती शिवाजी महाराज यांना आशिर्वाद दिला होता. श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेवुन मराठवाडा  दौऱ्यास आरंभ केल्याचे यावेळी स्पष्ट केले.   या युवा मेळाव्यास मोठ्या संखेने शिवसैनिक उपस्थितीत होते. 


 
Top