उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरासह जिल्हयात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुका विविध वाद्यांसह भव्यदिव्य काढण्यात आल्या . यावेळी जिल्हयात सर्वत्र पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आल्यामुळे उत्साहपुर्ण वातावरणात सर्वत्र शांततेत विर्जन मिरवणुका रात्री उशीरापर्यंत संपन्न झाल्या. 

यंदा विशेष म्हणजे श्री गणेश विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले होते. झांज पथक, ढोल पथक, टाळ पथक व विविध सादरीकरणाद्वारे या मिरवणुका निघाल्या. उस्मानाबाद शहरात श्री विसर्जन विहिर समतानगर व हतलाई तलाव येथे श्री गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. उस्मानाबाद शहरातून अनेक गणेश मंडळांनी भव्य मिरवणुकी ने सुरुवात केली. या मिरवणुकीत त्रिमुर्ती गणेश मंडळाच्या महिला ढोल पथकास व  क्वीन्स गणेश मंडळाच्या महिलांनी महिषासुर मर्दनी आंबेचे गोंधळी या  सादरीकरणाला मोठ्या प्रमाणात लोकांनी दाद दिली. तर पारंपारिक खेळ, झांज पथक, लेझीम पथकच्या सादरीकरणाला ही मोठ्या प्रमाणात दाद दिली. 

श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये माजी मंत्री तथा आ.राणाजगजितसिंह पाटील, खा.ओमराजे निंबाळकर, अा. कैलास पाटील आदींनी कांही गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला भेटी देऊन सहभाग नोंदविला.  

 
Top