तुळजापूर  / प्रतिनिधी-

आर्मीच्या 169 फिल्ड  मिडीयम रेजिमेंटच्या भवानी जोतिचे सैनिक फेडरेशन तालुका तुळजापूर शाखे   तर्फे    स्वागत  करण्यात आले. संभाजीनगर येथील आर्मिची 169 फिल्ड मिडीयम रेजिमेंट ने भवानी जोतिचे  आयोजन केले होते.

 या टीमचे तुळजापुरात सैनिक फेडरेशन तालुका तुळजापूर तर्फे  स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास उस्मानाबाद , सोलापूर व लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे  संचालन सैनिक फेडरेशन तालुकाध्यक्ष तुळजापूर दत्ता नवगिरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळजापूर तालुक्याचे  आमदार   राणा  पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूरचे नगराध्यक्ष  सचिन रोचकरी , गोकुळ  शिंदे ,विक्रमसिंह देशमुख,आनंद  कंदले, विशाल रोचकरी ,दुर्गादास अमृतराव , किशोर गंगणे,विजयकुमार सरडे,बबन गावडे , श्री पवार हे मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष दत्ता नवगीरे , कॅप्टन चव्हाण , सुभेदार काळे , उस्मानाबाद जिल्हा पूनर्नियुक्त अध्यक्ष ज्ञानदेव गुंड,सोलापूर माजी सैनिक अध्यक्ष  तलखेडे , लातूर जिल्हाध्यक्ष  किसन गिरी , तुळजापूर सैनिक फेडरेशन संघटक विठ्ठल लोखंडे,दादा खाबोले,सूर्यकांत भोजने,धनाजी धनके , शिवलिंग कांबळे,महादेव ठोंबरे व केशेगाव तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र कोळी  व अनेक माजी सैनिक उपस्थित होते. 169 फील्ड चे अधिकारी कॅप्टन जे. बी सिंग व त्यांची टीम उपस्थित होती.


 
Top