परंडा / प्रतिनिधी -

परंडा तालुक्यातील माणिकबाबा विद्यालय शेळगाव येथे तांदूळवाडी व डोंजा केंद्राची बीट स्तरीय शिक्षण परिषेद प्राचार्य काळे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 

  यावेळी निपूण मिञ अनिल गिरी सर यांनी कृतीतुन व शैक्षणिक साहित्याची जोड देत भागाकार यावर उत्कृष्ट सादरीकरण केले,त्यानंतर आनंद गायकवाड यांनी यालाच तंञज्ञानाची जोड दिली,तर केंद्रप्रमुख महामुनी सर यांनी अध्ययन स्तर इयत्ता 6ते8 बाबत सविस्तर विवेचन केले.read to me ॲप वापरा बाबत विषयतंज्ञ बाराते सरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यशाळेचा आढावा गटशिक्षण कार्यालय परंडाचे कार्यलयीन शिक्षण विस्तार अधिकारी  संगमनेरकर व बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी  निर्मळे यांनी घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी तांदूळवाडी व डोंजा केंद्रातील  पदोन्नीती मिळलेले विस्तार अधिकारी  दादासाहेब घोगरे (पाथ्रूड बीट) ‘पोपट परदेशी (मु.अ सोनारी), खरसडे सर (मु.अ डोंजा) यांना निरोप देण्यात आला.प्रस्तावीक केंद्रप्रमुख महामुनी सर यांनी केले तर प्रतिक्रिया केंद्रप्रमुख कांबळे सर ,देशमुख सर यांनी व्यक्ती केल्या .कार्यक्रम यशस्वीसाठी भोसले सर,मेदने सर ,किरण बनसोडे सर ,घोगरे सर ,देवकर सर ,सुरवसे सर ,शिंदे सर ,शेळके सर ,उकले सर ,धोंडे सर ,हजारे सर,दैन सर ,सावंत सर ,गोमेसर,गायकवाड सर ,राऊत सर ,तसेच माणिकबाबा विद्यालयातील सर्व स्टापचे मोलाचे सहकार्य लाभले. सुञसंचलन अनिल गिरी सर तर आभार बाळासाहेब घोगरे सरांनी मानले.कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीतानी झाली.


 
Top