उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या मार्फत खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक, कंपनी यांच्याकडील 145 पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने (व्हिडिओ कॉलिंग, फोन कॉलींग ) माध्यमातून मुलाखती घेऊन निवड प्रकिया करणार आहेत.

 या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जॉब सिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) करुन आपल्या प्रोफाईल मध्ये शैक्षणिक पात्रतेची नोंद करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रतेचा तपशील, आधार क्रमांक, मोबाईल, ई-मेल, पत्ता अद्यावत करावा. त्यानंतर मेळाव्यात ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्स कराव्यात. Jobseeker Login > Enter Aadhar Id/ Registration Id > My Profile > Pandit Dindayal Upadhyay Job Fair > District Select > Osmanabad  > Click Vacancy Listing  > मधून दिसणाऱ्या रिक्तपदानूसार आपल्या शैक्षणिक पातत्रेनूसार पदासाठी अप्लाय करावे.

 अर्ज करताना काही अडचण निर्माण झाल्यास या कार्यालयाच्या (02472) 299434 / 9028238465 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा. दि. 22 सप्टेंबर 2022 ते 27 सप्टेंबर 2022 कालावधीत पात्रता धारक उमेदवार ऑनलाईन अप्लाय करू शकतील. त्यानंतर संबधित उद्योजक,कपंन्याकडून मुलाखती आणि निवड याबद्दल उमेदवारास वेळोवेळी कळविण्यात येऊन पुढील प्रकिया करण्यात येईल.

 तरी या ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी अप्लाय करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.  


 
Top