उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 NHAI च्या नवीन प्रस्तावित असणाऱ्या 1271 किलोमीटर सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग हा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील परंडा, तुळजापूर आणि बार्शी तालुक्यातून जात असून या तालुक्यातील ज्या गावांमधून हा मार्ग जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित होणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या विविध अडचणींबाबत दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ठीक १.०० वा. यशवंतराव चव्हाण नगरपरिषद सभागृह, बार्शी येथे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार  म राजेनिंबाळकर यांनी या महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व उपायोजनांवर चर्चा आयोजित केली असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या राष्ट्रीय महामार्गात भूसंपादित होणार आहे त्या शेतकऱ्यांना या चर्चेसाठी उपस्थित राहण्याबाबत त्यांनी आवाहन केले आहे.

 हा नवीन असणारा ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग धाराशिव लोकसभा मतदारसंघातील परंडा, तुळजापूर आणि बार्शी तालुक्यांमधून जात असून परंडा तालुक्यातील चिंचपुर (खु.), पांढरेवाडी, सक्कारवाडी, उंडेगाव, रत्नापुर, मलकापूर, चिंचपुर (बु.), अनाळा, रोहकल, साकत (बु.), पिस्तमवाडी, कुंभेफळ, जाखे पिंपरी, टाकळी, राजुरी, घारगाव, कांदलगा, निजाम जवळा, सिरसाव, हिंगणगाव (बु.), आरणगाव, वाडी राजुरी   तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी, काटी, सांगवी काटी, सावरगाव, सुरतगाव, पिंपळा (खु.), पिंपळा (बु.), देवकुरळी, घट्टेवाडी, काटगाव, धोत्री, खडकी, शिवाजीनगर  आणि बार्शी तालुक्यातील बळेवाडी, कव्हे, दडशिंगे, पानगाव, लक्ष्याचीवाडी, नागोबाचीवाडी, कासारवाडी, अलीपूर, उपळाई, उंडेगाव, काळेगाव, मानेगाव, सासुरे, वैराग, रातंजन, सर्जापुर, हिंगणी (बु.), चिंचखोपण.

 या गावांमधून प्रस्तावित असून या गावातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या महामार्गामध्ये संपादित होणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सर्व अडीअडचणींसह या शेतकरी आणि अधिकारी चर्चेला यावे त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या आणि सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या अडीअडचणींचे निराकरण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल ,असे खासदार राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे.

 या राष्ट्रीय महामार्गात अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी भुसंपादित होणार असून त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक पुनर्वसन करणे, जेमिनी भूसंपादित झालेल्या भूसंपादक धारकांना त्यांचा योग्य मावेजा आणि मोबदला मिळवून देणे यांच्यासह इतर संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा होणार असून संबंधित नमूद तीन तालुक्यातील भूसंपादित होणाऱ्या शेतकऱ्यांनी या शेतकरी आणि अधिकारी संवाद चर्चेस उपस्थित राहण्याबाबत खासदार राजेनिंबाळकर यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.   


 
Top