उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. उस्मानाबाद शहरातील सरिता हॉटेल व बावर्ची हॉटेल येथे पोलिसांनी धाड टाकून रंगेहात पकडले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी या कारवाई 5 मुलींची सुटका केली आहे, त्यापैकी 4 जणी सरिता हॉटेल व एक मुलगी बावर्ची हॉटेल येथे सापडली आहेत. सोडविलेल्या महिलेतील 1 महिला उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील असून इतर 2 या परराज्यातील आहेत. दोन्ही ठिकाणी एक एक आरोपीला अटक केले असून पोलीस तपास सुरु आहे.हे दोन्ही आरोपी परराज्यातील असून ते हॉटेलमध्ये व्यवसाय करुन घेत होते. अपर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी कलम 370 मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख हे तपास करीत आहेत

 
Top