तेर / प्रतिनिधी-

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना सारखेच भयंकर संकट उभे टाकले होते .त्यामुळे आपल्याला कोणतेच सार्वजनिक सण उत्सव साजरे करता आले नाहीत .परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव निर्बंधाशिवाय आहे .त्यामुळे गणेश उत्सव धुमधडाक्यात  साजरा करा पण कायदा सुव्यवस्था सांभाळून असे आवाहन ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी  गोरोबा काका मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत आवाहन केले .         

 यावेळी तेर बीटचे अमंलदार प्रकाश राठोड  , पो.ना दत्ता थाटकर  , पो.काँ.साखरे  , किरण कदम ,   रोहित मुळे  , नंदकिशोर क्षिरसागर , प्रदीप घेवारे  आदिंसह गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची  उपस्थिती होते. .यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ज्या गणेश मंडळांना गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे आशा गणेश मंडळांनी अधिकृतपणे ऑनलाइन नोंदणी करून परवानगी घ्यावी तसेच गणेश उत्सव काळात गणेश मूर्तीसमोर जुगार खेळणाऱ्यावर, त्याचबरोबर सोशल मीडियावर भडकावू पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करणार .गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही राऊत यांनी केले. तसेच गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे. त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबवाव्यात व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत . मिरवणुकी दरम्यान आवाजाची मर्यादा 55 डेसिबल पर्यंत ठेवली आहे .त्यापेक्षा अधिक  आवाजाची नोंद झाल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच गणेश उत्सव काळात घरोघरी लक्ष्मी बसविल्या जातात. याच काळात चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून दागिने, पैसे सुरक्षित ठेवावे असे आवाहन राऊत यांनी केले.  या बैठकीला   गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते .


 
Top