परंडा / प्रतिनिधी - 

कृषी विभाग व आत्मा विभाग यांच्या सौजन्याने परंडा सोनगिरी येथे हरित क्रांती चे जनक कै.वसंतराव नाईक यांचे प्रतिमी चे पुजन करून रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला यावेळी २५ ते ३० रानभाज्या चे स्टॉल लावण्यात आले होते. 

      यावेळी कंडारी येथील आबा जाधव व खानापूर येथील नाळे गुरूजी यांच्या कौशल्याने कच्च्या मालापासून पक्का माल शेंद्रीय पॅकिंग करून ग्राहकांना आकर्षित करून विकला जातो म्हणून परंडा येथील तहसीलदार रेणूकादास देवणीकर, गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, कृषी अधिकारी  आबासाहेब रूपनवर, नगर परिषद मुख्याधिकारी थोरात मॅडम, अधिकारी बप्पा हांगे, मंडळ अधिकारी  कैलास देवकर, म.अ. तावरे , आत्मा चे समन्वयक अमोल पाटील, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, धनवे , तालुक्यातील उपस्थित कृषी सहाय्यक आदींनी या कार्याचे कौतुक केले.

 
Top