उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भारतातील नागरिकांना हर घर तिरंगा अभियान राबवुन 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करावा असे आवाहन भारत वासियांना केले आहे त्यामुळे धाराशिव जिल्हयातील प्रत्येक नागरिकानेआपल्या घरावर तिरंगा लावुन हर घर तिरंगा हे  अभियान  मोठया प्रमाणात राबवावे व देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करावा  असे आवाहन  माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा किसान मोर्चाचे पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी केले आहे. 

आपल्या देशा ने तिरंगा झेंडा समोर ठेवून हिंदुस्थानातील असंख्य देशभक्तांनी या भारत भूमीला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आपल्या घरादाराची राखरांगोळी,होळी करून प्रसंगी फासावर जाऊन   अशा कोणत्याही मार्गाने ही भूमी स्वतंत्र झाली पाहिजे याच्यासाठी निकराची झुंज देऊन इंग्रजांना सळो कि पळो करून क्रूर अशा इंग्रजांना आपल्या देशातून घालवण्यासाठी थोर देशभक्तांनी , स्वातंत्र्य सैनिक ,नागरिक, माता भगिनी अशा अबाल-वृद्धांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्लेल्या आहेत आपल्या पूर्वजांनी फार मोठा त्याग करून आपला देश पारतंत्र्यातून मुक्त केलेला आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या जीवनात चांगले दिवस आलेले पाहायला मिळतात अशा प्रकारची देश बांधवांनी जाणीव ठेवून  आपल्याला घरावर तिरंगा फडकवायचा आहे या निमित्ताने स्वातंत्र्य वीरांची आठवण आपल्याला होणार आहे त्यामुळे स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकावून साजरा करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी  केले आहे

 
Top