तुळजापूर / प्रतिनिधी-

भारत देशाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या राजेशहाजी महाध्दारवर लाईटींग रुपात तिरंगा ध्वज झळकला आहे. हैद्राबाद येथील देविभक्त शर्मा यांनी मंदीराचे मुख्य प्रवेशव्दार असलेल्या   राजे शहाजी महाद्वार वर तिरंगा लायटिंग करून दिलेली आहे.

पाच हजार बल्ब स्वरुपात हा तिरंगा मंदीर महाध्दारवर प्रकाशमान होणार असुन यासाठी फिक्सल लाईटींगचा वापर केला असुन प्रोग्राम लायटींग व्दारे तिरंगा महाध्दार वर झळकणार आहे. या तिरंगा विद्युत रोषणाचे काम  पुर्ण होवुन भाविकांना ही  आकर्षक लाईटींग बघण्यासाठी बुधवार दि. १०रोजी खुली करण्यात आली. 

 
Top