तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधाचे वेशभूषा परिधान करून श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी तसेच स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रप्रमुख बाबासाहेब अंकुशे यांच्या हस्ते करण्यात आले.

बाबासाहेब दुर्गादास पवार इयत्ता सातवी व श्रवण युवराज शिंदे इयत्ता पहिली या विद्यार्थ्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर भाषण केले. मुख्याध्यापक  गणेश रोचकरी यांनी कृष्ण झालेले आर्यन रविकरण साळुंख इयत्ता तिसरी, संस्कार संतोष पवार इयत्ता पहिली ,राधा झालेले तेजस्विनी लखन झाडीपिडे इयत्ता तिसरी, स्वानंद स्वानंद धीरज नरसोडे इयत्ता पहिली या विद्यार्थ्यांचे खाऊ देऊन कौतुक केले.

  यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य महेंद्र पाटील , सहशिक्षक महेंद्र कावरे, सुरजमल शेटे ,श्रीमती एस. बी .गिराम, श्रीमती के.ए. लोहारे, श्रीमती जाधव ए.बी यांनी कार्यक्रम यशस्वी साठी परिश्रम घेतले.

 

 
Top