तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील मौजे  मंगरुळ  येथील एम.डी.आर ४ १ अंतर्गत मंगरुळ  ते माळुंब्रा  रस्ता अंतर्गत  मंगरुळ  गावातील रस्ताची दुरावस्था झाल्याने  तो तात्काळ    दुरुस्ती करण्याची  मागणी   मकरंद बाळासाहेब लबड़े  सा.बां उपविभाग उपअभियंता  यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात  म्हटलं आहे की, आपल्या   अखत्यारातील  असणाऱ्या एम.डी.आर ४१ रस्ता मौजे मंगरुळ ते माळुंब्रा  या रस्त्याची मौजे मंगरुळ येथे अवस्था खूपच दयनिय झाली असून सदरील रस्त्यामुळे प्रवाशांच्या जिवीतांचा आणि नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदरील रस्ता दुरुस्तीची मागणी गेल्या दोन वर्षापासून होत आहे. 


 
Top