उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंञी संजय पाचपोर यांनी शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा भाजपा किसान मोर्चा पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी शाल,पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला यावेळी अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ.सारंग जोशी, सहकार भारती प्रदेश सचिव संजय गायकवाड, रा.स्व.संघाचे विभाग कार्यकारिणी सदस्य सतिश कोळगे, अभाविपचे धाराशिव शहर विस्तारक ज्ञानेश्वर उद्देवाल यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना श्री. पाचपोर म्हणाले की, सहकार खात्याने राज्यातील बिगर कॄषी सहकारी पतसंस्थाकडून अशंदान जमा करण्याचे परिपञक काढले आहे जे की, 10 पैसे प्रति शेकडा याप्रमाणे गत 3 वर्षातील अंशदान शासनास पतसंस्थानी जमा करावेत असे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिलेले आहेत. त्यास सहकार भारती तिव्र विरोध करीत असुन सरकारच्या या अन्याकारक निर्णया विरोधात आपण पाठपुरावा करीत असुन त्यास यश येईल असे त्यांनी सांगितले.यावेळी अभावपिचे शहर मंञी तेजसिंह कोळगे,व्यवस्थापक शाम गंगावणे यांच्यासह कर्मचारी यांची उपस्थिती होती.