परंडा / प्रतिनिधी -

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन ध्यास नाविन्याचा शोध नवोद्योजकांचा या राज्यातील नागरिकांच्या नव संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांसाठी व तमाम नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी कार्यरत आहे. 

 परंडा तालुक्यात लोकसमूह एकत्रित होण्याच्या ठिकाणी स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रबोधनासाठी फिरते वाहन मोबाईल व्हॅन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयामध्ये आली होती. यात्रेबाबतची संपूर्ण माहिती नावीन्यपूर्ण संकल्पना त्याची इतर पैलू तसेच विभाग मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने ,महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभने, अनिल जानराव, धनंजय गायकवाड, जयवंत देशमुख ,भागवत दडमल, दत्ता आतकर आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते .यावेळी महाराष्ट्र स्टाटप यात्रा या मोबाईल व्यान बरोबर आलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभागी होण्यास आवाहन केले. स्टार्टअप यात्रेचे प्रामुख्याने तीन टप्पे आहेत. तालुकास्तरीय प्रचार व प्रबोधन ,जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा ,राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची घोषणा. यासाठी पारितोषिके खालील प्रमाणे आहेत. जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक 25000, द्वितीय 15000 व तृतीय दहा हजार रुपये .विभाग स्तरीय पारितोषिक सहा स्टार्टअप हिरो-  प्रत्येकी रुपये एक लाख ,सहा सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका- प्रत्येकी रुपये एक लाख तर राज्यस्तरीय सात क्षेत्र निहाय प्रत्येकी दोन विजेते प्रथम एक लाख रुपये तर द्वितीय ७५ हजार रुपये अधिक माहितीसाठी www.msin.in या वेबसाईटवर जाऊन संपर्क करावा अशी माहिती प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी यावेळी दिले.


 
Top