परंडा / प्रतिनिधी - 

गुजरात सरकारने बिलकीस बानो यांच्या वर केलेल्या अत्याचार प्रकरणातील ११ बलात्कारी आरोपीची सुटका केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या विभागीय अध्यक्ष वैशाली मोटे यांच्या मागदर्शना खाली परंडा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने  तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देऊन त्या आरोपीना पुन्हा गजाआड करा अशी मागणी करण्यात आली.

 या निवेदनावर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षा स्वाती गायकवाड, उपाध्यक्षा दैवशाला खैरे, मा.नगरसेविका रत्नमाला बनसोडे,रंजना माने,रूपाली लोखंडे,राखीताई देशमुख, मिनाक्षी काळे,राष्ट्रवादी सामाजीक विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बासोडे, शहराध्यक्ष वाजीद दखनी, युवक अध्यक्ष जावेद मुजावर, संचालक मजुर फेडरेशन धनंजय हांडे, मा.सरपंच हनुमंत गायकवाड, बाबुराव काळेसर घनःश्याम शिंदे, ,अमोल जगताप, शिरू शेख,समीर मदारी, अविनाश आटोळे सर,श्रीहरी नाईकवाडी,नंदु शिंदे,,रंगनाथ ओव्हाळ,दिपक ओव्हाळ,बिभीषण खुणे,,हुसेन शेख,सलीम हन्नुरे,अजहर शेख,जुबेर पठाण,शरीफ शेख, समीर काझी,पप्पू शेख,अफ्रेर शेख, शफीक इनामदार, शाबुदिन सय्यद, जुबेर दखनी, मेहबुब काझी,अस्तम मदारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top