उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सतत झालेली पावसाची अतिवृष्टी, गोगलगाय व किडींचा प्रादुर्भाव तसेच यलो मोझॅ या रोगामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात व विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑगस्ट रोजी आली आहे.  

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मागील ३ महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. परंतू पेरणी झाल्याबरोबर महिन्यातच पडलेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या १५३ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. त्यातच नव्याने गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हजारो सोयाबीनचे पीक गोगलगायने उध्वस्त केले आहे. तर उरलेल्या सोयाबीनला शेंगा व फुले लागल्याच्या अवस्थेत असताना यलो मोझॅक या विषाणूजन्य रोगामुळे उभे पीक पिवळे पडू लागले आहे. हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतातील रोगग्रस्त पीक उपटून फेकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही.

अशा तिहेरी संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांचे नगदी म्हणवणारे सोयाबीन हे पीक हातचे गेले आहे. त्यामुळे मागील महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्या आहेत.

अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति हेक्टरी सरसकट मदत देण्यात यावी असे निवेदनात मध्ये म्हणले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष श्याम घोगरे, कार्याध्यक्ष नानासाहेब जमदाडे, उस्मानाबाद शहराध्यक्ष शेख आयाज, सां. वि. जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, पीक जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तुषार वाघमारे, माजी नगरसेवक खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, पृथ्वीराज इस्माईल शेख, चिलवंत, अशोक पेठे, मृत्युंजय बनसोडे, नवनाथ क्षीरसागर पांडुरंग सुतार, शेखर घोडके, अन्वर शेख, बिलाल तांबोळी, रणवीर इंगळे, एजाज काझी, प्रेमचंद मुंडे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top