उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे पहिले ऊस बिल (एफआरपीप्रमाणे) त्वरीत देण्यात यावे, ज्या कारखान्यांनी पहिली उचल दिलेली नाही. अशा कारखान्याचे तात्काळ साखर विक्री परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी पुणे येथे गुरुवारी (दि.25) भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांनी अतिरिक्त झालेला ऊस उस्मानाबाद जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे जानेवारी ते मे 2021-22 महिन्यापर्यंत पाठविला होता. ऊस पाठवून चार महिने झाले. मात्र अद्यापही पहिली ऊसाची उचल (एफआरपीप्रमाणे) काही कारखान्यांनी दिली नाही. अशा साखर कारखान्याचे साखर परवाने रद्द करुन त्यांचे साखर गोडवून ताब्यात घेवून त्याचा शासन स्तरावर लिलाव करावा. व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शेतकर्यांचे ऊस बील त्वरीत वाटप करण्यातसंदर्भात पुणे साखर आयुक्त यांना सूचित करण्यात यावे, अशी मागणी दुधगावर यांनी निवेदनात केली आहे. मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ शेतकरी कुटूंबातील सदस्यांनी आर्थिक विवंचणेतून आत्महत्या केल्या आहेत. ज्या साखर कारखान्यांनी ऊसाचे पाहिले बील (एफआरपीप्रमाणे) अद्याप दिलेली नाहीत. अशा कारखान्यांचे साखर विक्री परवाने रद्द करुन साखर गोडावून ताब्यात घेवून शासन स्तरावर साखरेचा लिलाव करावा व शेतकर्यांचे थकीत पहिले ऊस बिील शासनामार्फत त्वरीत वाटप करावे, यासाठी संबधितांना सुचित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात दुधगावकर यांनी केली आहे.