उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय जनता पार्टी धाराशिव, लोकसभा क्षेत्रातील बुथ सशक्तीकरण अभियाना अंतर्गत   प्रतिष्ठाण भवन धाराशिव येथे  आ.राणाजगजितसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सुचनेनुसार व  संजयजी कौडगे (संघटन मंत्री) व श धनंजय कुलकर्णी (बुभ सशक्तीकरण विभाग संयोजक) यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. 

‘मेरा बुथ सबसे मजबुत’ कसा होईल यावर चर्चा करून येणार्‍या लोकसभा, विधासभा निवडणुकीत आपला बुथ प्लस झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत कशा पोहचविता येईल. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, प्रविण पाठक, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, संतोष बोबडे, राजकुमार पाटील, कैलास शिंदे, सचिन इंगोले, मदन दराडे व प्रदिप शिंदे, जगदिश जोशी, बालाजी चव्हाण, ॲड.ज्योती वाघे, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top