उमरगा/ प्रतिनिधी-

देशाच्या गौरवशाली इतिहासात महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याच विचारावर काँग्रेस पक्ष वाटचाल करत आला आहे. म्हणूनच  75 वर्षाच्या वाटचालीत  देश कृषी, उद्योग, शिक्षण, अर्थकारण, तंत्रज्ञान यामध्ये अग्रेसर ठरला आहे. देशाच्या जडणघडणीत काँगेस पक्षाचे मोठे योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री. बसवराज पाटील यांनी केले.

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात आझादी गौरव पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री.नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा.श्री. बसवराज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा.श्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यात 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान आझादी गौरव पदयात्रेला सुरुवात झालेली आहे. उमरगा येथे आज (दि.12) पदयात्रेचे आगमन झाल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर शांताई मंगल कार्यालयात झालेल्या सभेस उपस्थितांना संबोधीत करताना श्री.पाटील बोलत होते.

  यावेळी उपस्थित मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली. प्रस्ताविक दिलीप भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण बिराजदार यांनी तर आभारप्रदर्शन चंद्रशेखर पवार यांनी केले. यावेळीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मा.चेअरमन बापूराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील, महाराष्ट्र काॅग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,  तालुकाध्यक्ष ॲड. सुभाष राजोळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, विठ्ठलसाई कारखान्याचे व्हा. चेअरमन सादिकमिया काझी,  ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बलभीमराव पाटील, किल्लारी कारखान्याचे व्हा. चेअरमन विजयकुमार सोनवणे, विठ्ठलराव बदोले, नानाराव भोसले, विठ्ठलराव पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड,  मा.सभापती मदन पाटील,गोविंद पाटील, युवक काँग्रेस प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, मा.नगराध्यक्षा सौ.प्रेमलता टोपगे, मा.नगरसेवक विक्रम मस्के, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश राठोड, मा.सभापती सचिन पाटील, विठ्ठलराव पाटील, मा.जि.प.सदस्य रफीक तांबोळी, धनराज हिरमुखे,महीला काँग्रेसच्या सौ.संगीता कडगंचे, संगीता पाटील, सुवर्णा भालेराव, तनया कडगंचे, विजय वाघमारे, नगरसेवक दिपक मुळे, ॲड. विरसंगप्पा आळंगे, धनराज हिरमुखे, एम. ओ. पाटील, रशीद शेख, दीपक मुळे, गौस शेख, याकुब लदाप, हरी लोखंडे, विक्रम मस्के, महेश माशाळकर, विजय वाघमारे, पप्पू सगर, प्रा.शोकत पटेल, राहुल वाघ, बबन बनसोडे, सुधीर चव्हाण,शिवाजी गायकवाड, परमेश्वर टोपगे, गणेश पाटील आदीसह काॅग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top