उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत दि १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा परिषद मुख्यालयात समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण  सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

 कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता, केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी, कोरोना संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करत, कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी यांनी केले आहे.


 
Top