उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील शिवशंभू पंढरी वसाहतीत रामकृष्णहरि सत्संग मंडळ व संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने  आई लॉन्स जवळ सत्संग हॉल येथे  संस्कृत स्पर्धा संपन्न झाल्या. नगरसेविका सौ. प्रेमाताई पाटील, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शाम दहिटणकर, कुमार व्यास, बाल किर्तनकार राजश्रीढवळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

  या प्रसंगी प्रास्ताविक  प्रा.दहिटणकर यांनी केले.   दौरान  स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक, रजिष्टर व पेन बक्षीस देण्यात आहे. परीक्षक म्हणून संदिपान गायकवाड, गर्जे पी.ए., श्रीमती शिंदे यु. एम., कुमार व्यास यांनी काम पाहिले. शेवटी गायकवाड यांनी आभार मानले. सर्व उपस्थित व सहभागी विद्यार्थ्याचे कौतुक करून पुढील वर्षी अधिक संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास कलाध्यापक शेषनाथ वाघ आदि शिक्षक  पालक उपस्थित होते.


 
Top