तुळजापूर /प्रतिनिधी- 

महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव कृषी यांनी रविवार दि.२१रोजी तुळजापूर तालुक्यात येवुन अतिवृष्टी झालेल्या मंगरुळ विभागातील कसई, भातंब्री, नादुंरी, इटकळ भागातील शेतात जावुन शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मांगणी भाजपा ओबीसी मोर्चा जिलाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी केली आहे. 

बांधित पिकांची पहाणी करताना  जिल्हा कृषी अधिकारी बिराजदार , तहसीलदार सौदागर तांदळे,  गट विकास अधिकारी प्रतापसिंह मरोड,  तालुका कृषी अधिकारी एस पी  जाधव , मंडल अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक ,सरपंच, ग्रामसेवक, शेतकरी सुरेश पाटील, हरिदास मुळे, दिलीप भोकरे, विलास सरडे, सरपंच मोहन मुळे, उपसरपंच हनुमंत पाटील, रवी कुलकर्णी, रफिक शेख, तानाजी पाटील, बाबासाहेब गुरव, धनंजय साखरे, बाबू शिंदे,आनंद उपासे व   चित्तरंजन सरडे प्रदीप वाले , पुरुषोत्तम देशमुख , रवी बंडगर,  सयाजी शिंदे इत्यादी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

 
Top