मुरूम/प्रतिनिधी

दाभोळकर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार पकडा, धर्मांध संघटनेवर बंदी आणा व खटला जलदगतीने चालविण्यात यावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाचे उमरगा येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.

निवेदनावर अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. किरण सगर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, महिला आघाडीच्या प्रमुख प्रा. अवंती सगर, मुरूम शाखेचे कार्यकर्ते प्रा. गोपाळ कुलकर्णी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी अजिंक्य कांबळे, योगेश पांचाळ आदींच्या सह्या आहेत.


 
Top