उस्मानाबाद / प्रतिनिधी-

१५ ऑगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहन झाल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यांला ७५ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भव्य रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रैलीत सर्व जाती धर्माचे लोक त्याचप्रमाणे विविध गणेश मंडळ पारंपारिक वाद्यासह िदड किलोमिटर ध्वज घेऊन २५ कलापथकासह  या भव्य रैलीत  सहभागी सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत िदली. 

शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जगताप, माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे, सिध्दविनायक उद्योग समुहाचे दत्ता कुलकर्णी, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे , विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष अॅड. नितीन भोसले आदी यावेळी उपस्थित होते. पुढे बोलताना अामदार पाटील यांनी या भव्य रॅलीत दीड किलोमीटर ध्वजासह भारत मातेचा रथ असणार आहे. या रॅलीत विभिन्न पारंपारिक खेळ, दाखविले जाणार आहेत. वििवध जातीचे लोक आपल्या पारंपारिक वेशभुषेत येणार आहेत. शहरातील सर्व शाळा या सहभागी होणार आहेत. त्याच प्रमाणे महिला, युवती, राष्ट्रीय खिलाडू, अधिकारी -कर्मचारी सहभागी होतील. जिजाऊ चौकातून या रैलीस प्रारंभ होकर छत्रपती शिवाजी महाराज चौकात या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. 

एनडीआरएफचे निकष बदलणार

सततच्या पावसामुळे जिल्हयात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा एनडीआरफच्या मदतीमध्ये समावेश होऊ शकत नाही.त्यामुळे एनडीआरएफच्या निकषामध्ये बदल करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यास भाग पाडावे, नुकसान अहवाल तहसीलदारकडे जमा करावे, असे सांगून अामदार राणाजगजितसिंह पाटीलयांनी नुकसान अहवालानुसार अनुदान मिळाल्यानंतर पिकविम्याचे २५ टक्के मदत मिळण्यासाठी आपण प्रयत करणार असल्याचे. अामदार पाटील यांनी सांगितले. 

राष्ट्रीय दिव्यांग शिबीर

केंद्र सरकारकडे पाटपुरावा करून उस्मानाबाद जिल्हयात राष्ट्रीय दिव्यांग शिबीर आयोजित केले असून या शिबीराचा लाभ घ्यावा या शिबीरामध्ये कृत्रीम अवयव, आवश्यक असलेल्या अपंगाना स्कुटर सह अन्य साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे अामदार पाटील यांनी सांगितले. 

 
Top