उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य तसेच शहराच्या साहित्यीक व सांस्कृतीक चेहरा असलेले माधव गरड यांचे आज पहाटे पाच वाजता न्युमोनियाने सोलापूरच्या यशोदा रूग्णालयात निधन झाले ते 67 वर्षे वयाचे होते.त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

गरड हे मुळचे चिकुंद्रा (ता.तुळजापूर) गावचे होते. उस्मानाबाद आगाराचे ते निवृत्त कर्मचारी होते.30 जुलै पासुन त्यांना न्युमोनियाचा त्रास जाणवत होता. उपचारासाठी त्यांना सोलापूरच्या यशोदा रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्यांची प्रकृती खालावत गेल्याने शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मुळ गाव चिकुंद्रा येथे आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रध्दांजलीपर भाषणे करण्यात आली. यावेळी नितीन तावडे, अमित शिंदे, हनुमंत पडवळ, बालाजी तांबे, माधव इंगळे, रूपेश जावळे, विशाल शिंगाडे, अरविंद हंगरगेकर, कृष्णा तेरकर, शिवाजी गायकवाड, युवराज नळे, सुभाष चव्हाण, साहित्यीक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top