उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबाबत जागृतीसाठी उस्मानाबाद शहर वाहतूक शाखेच्या वतीने ऑटो रिक्षाला तिरंगा ध्वज लाऊन शहरातून रॅली काढण्यात आली. यात ५० ते ६० रिक्षा सहभागी झाल्या होत्या.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी रॅलीतील रिक्षा चालकांना कायदा व नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी विद्यालय, उस्मानाबाद येथील विद्यार्थी व शिक्षकांनाही उपक्रमांतर्गत मार्गदर्शन केले. त्यांच्याही रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलींची सुरवात केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी घेटे, उस्मानाबाद (श.) पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, वाहतुक शाखेचे सपोनि अमित मस्के यांसह अंमलदार व उस्मानाबाद रिक्षा युनियनचे अध्यक्ष- जमाल तांबोळी यांसह रिक्षा चालक उपस्थित होते.

 
Top