उ


स्मानाबाद /प्रतिनिधी -

आज महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीतानाजीराव सावंत यांनी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या संवाद निवासस्थानी भेट दिली.

    महाराष्ट्र राज्यात भाजपा-शिवसेना युती सरकारचे स्थापन झाले. या सरकारच्या नवीन मंत्रीमंडळात मा. ना. तानाजीराव सावंत सर यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड करण्यात आली. मंत्री महोदय परंडा येथे आल्यानंतर भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या संवाद निवासस्थानी भेट घेतली. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी शुभेच्छा दिल्या..

    यावेळी धनंजय सावंत, दत्ताआण्णा साळुंके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, परंडा न.प. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, मुकुल देशमुख, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, विठ्ठल तिपाले, नगरसेवक विठोबा मदने, अन्वर लुकडे, मुस्साभाई हन्नूरे, शहराध्यक्ष ॲड संदीप शेळके, युवा नेते समरजितसिंह ठाकूर, संकेतसिंह ठाकूर, तानाजी वाघमारे, शिवाजी पाटील, साहेबराव पाडुळे, अरविंद रगडे, प्रमोद लिमकर, बाळु गोडगे, रामकृष्ण घोडके, सिध्दीक हन्नुरे, अविनाश विधाते, युसुफ पठाण, किरण देशमुख तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top