शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी विधान परिषद सदस्य विनायक मेटे यांच्या निधनामुळे मला व्यक्तिशः अतिव दुःख व धक्का बसला आहे. 2007 पासून माझे आणि त्यांचे व्यक्तिगत संबंध होते.त्यांनी मराठा समाजासाठी केलेले कार्य सर्वांनाच माहिती आहे.बीड जिल्ह्यातील राजेगाव या गावातून त्यांच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली.सामान्य परिस्थितीतून उभा राहिलेला हा नेता सर्वसामान्य लोकांसाठी एक आदर्श उदाहरण होता.त्यांनी मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले होते त्यासोबतच महाराष्ट्रात शिवसंग्राम पक्षाचेही जाळ त्यांनी उभा केलं होतं.आज त्यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले त्यांच्या मृतात्म्यास मी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.


 डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,उस्मानाबाद

 
Top