उस्मानाबाद /प्रातिनिधी : -
विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. मराठा समाजासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मराठा आरक्षणाचा लढा चालूच ठेवू हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली अश्या शब्दात मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विनायक मेटे यांना बार्शी येथे शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी आमदार राजाभाऊ राऊतसह पदाधिकारी उपस्थित होते.
कॅबिनेट मंत्री झाल्यावर प्रा डॉ तानाजीराव सावंत हे पहिल्यांदा उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यामुळे जिल्ह्यात भव्य स्वागत व सत्कार समारंभ ठेवले होते मात्र मेटे यांचे निधन झाल्याने त्यांनी परंडा, भूम, वाशी कळंब व उस्मानाबाद तालुका दौरा रद्द केला आहे. सावंत आज कुठेही हारे-तुरे सत्कार स्वीकारणार नाहीत.