उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

आझादी का अमृत महोत्सवा निमित्त सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संचालिका प्रो.शालिनी भरत, अधिष्ठाता, प्रो. रमेश जारे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये  नशा मुक्त भारत अभियाना राबविण्यात आले. 

अभियानाची सुरुवात कॅम्पसचे  अधिष्ठाता प्रो. रमेश जारे यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनीचे उदघाटन करून करण्यात आले.  

याप्रसंगी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे डॉ.श्रीधर सामंत, डॉ.आशिष नवनीत, NMBA अभियानचे समन्वयक श्री.गणेश चादरे, श्री.आनंद भालेराव, श्री. शंकर ठाकरे महाविद्यालयाचे  प्राध्यापक, स्टाफ व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्यांनी उपस्थिती होते.  

 संस्थेच्या वतीने अभियाना अंतर्गत सोल्गन रायटिंग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, पोस्टर पेंटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये 150 विद्यार्थांनी सहभाग घेतला. व्यसनाधीनतेवर विद्यार्थ्यानी काढलेल्या भव्य अशा पोस्टर्स प्रदर्शनचे उदघाटन करून व नशा मुक्त भारत जनजागृती रॅलीची सुरवात संस्थेचे अधिष्ठाता प्रो. रमेश जारे यांच्या हस्ते करण्यात आली.  नशा मुक्त भारत, सशक्त भारत, नशे से दोस्ती, जीवन से मुक्ती अशा घोषणा देत या रॅलीमध्ये 300 जणांनी  सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे उदघाटक प्रो.रमेश जारे या प्रसंगी म्हणाले की, नशा मुक्त भारत करण्यासाठी विद्यार्थ्याची भुमिका महत्वाची आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली व्यसनाधिनता ही गंभीर

बाब तर आहेच पण ती एक सामाजिक समस्या ही आहे. त्यामळे येणाऱ्या काळात

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीने शाळा, कॉलेज मधील विद्यार्थ्याना, व्यसनी व्यक्तींना व त्या कुटुंबांना मोठ्या प्रमाणात मोफत समुपदेशन करणार असल्याचे सांगितले.

या प्रसंगी डॉ. श्रीधर सामंत म्हणाले की, कॉलेजच्या वतीने हे अभियान यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कार्यक्रम समन्वयक श्री. गणेश चादरे म्हणाले की, विद्यार्थ्यानी आपल्या शिक्षणाचा उद्देश व ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी.  कुठलेही व्यसन करण्या अगोदर आपल्या शिक्षणासाठी आपले आई वडील घेत असलेली मेहनत व तुमच्याकडून त्यांच्या  असलेल्या अपेक्षा याचा विचार करावा.  त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांनी व गुरुजणांनी दिलेल्या योग्य संस्काराची जाणीव ठेवून मार्गक्रमण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.  व्यसन करणाऱ्या व्यक्तीमुळे त्या कुटुंबात अनेक समस्या निर्माण होत आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणावर होणारा परिणाम मुलांनी ठरवलेले ध्येय त्यांच्या भविष्यतील अपेक्षा पूर्णत्वाला न जाण्यामध्ये व्यसन हा मोठा अडसर ठरत आहे.  त्यामुळे  व्यसनी व्यक्तींनी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी नशा मुक्त जीवन जगावे व त्या माध्यमातून या अभियानात सहभाग द्यावा असे आव्हान केले.  

याप्रसंगी, जिल्हा तंबाखु नियंत्रण कक्षाचे समन्वयक श्री. राठोड यांनी तंबाखुचे दुष्परिणाम याविषयावर मार्गदर्शन केले. भाषण स्पर्धेमध्ये 19 विद्यार्थ्यानी भाग घेतला व आपले विचार मांडले.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.आनंद भालेराव यांनी केले .  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर ठाकरे, विद्यार्थी वैष्णवी, सलोनी, आयुषी, वेंकटेश, डिपांसु , रुषिकेश व सर्व सी.आर यांनी अथक परिश्रम घेतले.

 
Top