उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 शहरातील वीरशैव जंगम मठ येथे श्रावण मासानिमित्त शिवनाम सप्ताहा चे आयोजन केले होते. दरम्यान जगन्नाथ महाराज यांची प्रसादा ची कीर्तन सेवा झाली. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांनी वीरशैव जंगम मठात शिवनाम सप्ताह  उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी व्यासपीठ प्रमूख सौ. शकुंतला लगदिवे होत्या. या वेळी लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्या  हस्ते श्री श्री 108 राचलिंग शिवाचार्य महाराज यांच्या  संजीवन समाधी चे पूजन व पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धनंजय  रणदिवे  यांच्या हस्ते परम रहस्य ग्रंथाची  पूजन करण्यात आले. माजी नगरसेविका सौ. प्रेमाताई पाटिल यांच्या हस्ते पंच कलश चे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय चर्मकार महासंघा चे युवा प्रदेशाध्यक्ष नितिन शेरखाने यांच्या व पंडित नाना लोमटे व शिवसेना युवा नेते तूषार  निंबाळकर यांच्या हस्ते माता पार्बती चे पूजन अमोल पेठे यांच्या हस्ते मृदंग पुजन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी श्री श्री 108 राचलींग शिवाचार्य महाराज यांचे पुष्पहार घालून आशिर्वाद घेवून महानंदी प्रतिष्ठापना केली. त्यानंतर वीरशैव महिला मंडळ व भजनी मंडळ यानी भव्य कलश मिरवूणूक काढून फुगड्या खेळून, टाळ ,मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून उत्साह साजरा केला. 

 या वेळी  डॉ.अनंत राजमाने , श्रीकांत साखरे, , प्रगती पतसंस्थे चे चेअरमन प्रशांत पाटील, , काँगेस चे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे , पत्रकार गोविंद पाटील, पत्रकार उपेंद्र खटके, पत्रकार कैलास चौधरी सोमनाथ शेटे,   विलास सांजेकर,  अॅड. गणपती कांबळे, विश्वजित शिंदे उदय देशमुख,एकता फाउंडेशन चे सदस्य  आदी  उपस्थित होते.   या वेळीं सर्व मान्यवरां चा सत्कार ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला. या वेळी धंनजय रणदिवे यांनी मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. या वेळी सर्व मान्यवरांनी ट्रस्ट चे अध्यक्ष शिवानंद कथले व वैजिनाथ गुळवे यांचा  सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद चे अध्यक्ष शिवानंद कथले व आभार प्रदर्शन वैजिनाथ गुळवे यांनी  केले. या वेळी लिंगायत समाज बांधव बहुसंख्येने  हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव महिला भजनी मंडळ व लिंगायत संघर्ष समिती महिला आघाडी आदी ने परिश्रम घेतले. महाप्रसादानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
Top