उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

कमी दाबाने विजपुरवठा होणे, कोणतीही पुर्व सूचना न देता अचानक वीज गुल होणे यामुळे  हजारो वीज ग्राहकांना वीजवितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा आर्थिक फटका बसत आहे. यावर महावितरण कंपनी कामात सुधारणा करण्याऐवजी गलथानपणाचे अनेक उदाहरणे घालून देत आहे. 

महावितरण यापुर्वी पावसाळा येण्यापुर्वीच प्रामाणीकपणे वीज वाहक तारेला स्पर्श करणाऱ्या झाडाच्या फाद्या तोडत असत परंतू गेल्या दो ते तीन वर्षांपासून झाडाच्या फांद्या विजवाहक ताराला घर्षन केल्यानंतर व वीज गुल झाल्यानंतर महावितरणच्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाग येते. सदर झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी एक ते दीड तास वीज पुरवठा बंद होतो. त्यानंतर पुन्हा वीज येते.वीज आली तर कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे अनेकांचे संगणक, इलेक्ट्रॉनीक्स उपकरणे चालू होत नाहीत तर अनेकांना कमी-जास्त दाबामुळे होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे आर्थिक फटका बसल्याचेही समोर आले आहे. महावितरण कंपनी आपला कारभार सुधारण्याचे नांव घेत नाही. 

मीटर मध्ये बदल

दर एक ते दोन वर्षांनी महावितरण कंपनी तर्फे वीज ग्राहकांचे वीज बील मींटर बदलले जाते.विशेष म्हणजे सरकार बदलले की, ह्याचे मीटर बदलाचे काम चालु होते. सध्या डिजीटल वीज मींटर लावण्याचे काम सुरू असुन जवळवळ हे काम संपत आहे. परंतू अशा प्रकारचे डिजीटल मीटर किती वीजवितरण कंपनी अधिकाऱी व कर्मचाऱ्यांच्या घरी लावले आहेत हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. यापुर्वी इलेक्ट्रॉनीक्स मीटर, लावण्यात आले होते. ते काढून नव्याने डिजीटल मीटर लावण्यात आले. एकीकडे वीजवितरण कंपनी प्रचंड तोट्यात असल्याचे सांगत असतानाच नेमके हे बदल केल्यामुळे महावितरण कंपनीच्या नफ्यात किती वाढ झाली. हे पाहणे आवश्यक झाले आहे. एक तर वीज ग्राहक िस्थर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन आकार, वीज शुल्क, वीज विक्री कर यामुळे परेशान असताना वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहकांची डोके दुखी वाढली आहे. 

मराठी भाषा बंद

विज वितरण कंपनीचे वीज बील पुर्वी मराठी भाषेत येत होते. परंतू गेल्या चार ते पाच महिन्यापासून ते इंग्रजी भाषेत येत आहे.एकीकडे राज्यात मराठी भाषेवरून मोठ्या प्रमाणात राजकारण चलते परंतू सरकार मधीलच एक कंपनी आपल्या ग्राहकांना वीज बिले इंग्रजीमध्ये देतात. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. विशेष म्हणजे मराठी वीज बिल येत असताना वीज ग्राहक वीज बिलावरील   िस्थर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन आकार, वीज शुल्क, वीज विक्री कर आदी बाबत प्रश्न विचारत असल्यामुळे महावितरण ने वीज बीलचे रूपांतर इंग्रजी भाषेत करून टाकलेे आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

 
Top