काटी  / प्रतिनिधी-

मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणारा छळ, मुलगी नकोशी म्हणून केला जाणारा केला जाणारा तिरस्कार, मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमीच ऐकतो. परंतु सध्या मुलींच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत आहेत. असाच एक प्रसंग तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे शनिवार दि.20 रोजी पहावयास मिळाली. 

मंगरुळ येथील पोलीस पाटील पदावर कार्यरत असणाऱ्या लक्ष्मण राजेंद्र माळी यांना दुसऱ्यांदा मुलगी झाली त्यामुळे माळी कुटुंबियांनी आपल्या कन्यारत्नाचे आकर्षक सजावट केलेल्या वाहनाने आगमण, वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत बसस्थानक ते घरापर्यंत रांगोळी आणि रस्त्यावर फुले अंथरुन, फुलांची सजावट करीत गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून जिलेबीचे वाटप करीत स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करीत समाजातील अनिष्ट परंपरेला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे पोलीस पाटील लक्ष्मण माळी यांनी पहिल्या मुलीच्या जन्मानंतरही अशाच प्रकारे जंगी स्वागत केले होते

  मंगरुळ  येथील पोलीस  पाटील  या पदावर कार्यरत  असणाऱ्या  लक्ष्मण राजेंद्र माळी यांना दुसऱ्यांदा मुलगी झाली   त्यांच्या माळी कुंटूबात पाच पिढ्यानंतर दुसरी मुलगी जन्माला आली. त्यामुळे माळी कुटुंबात आनंदाला पारावर  राहिला नाही. माळी कुटुंबातील सदस्यांनी मुलीला दवाखान्यातून गावात आणल्यानंतर स्त्री जन्माचे मिरवणूकीने जंगी स्वागत करीत करीत गर्भपात करणाऱ्यांसाठी माळी कुटुंबियांनी या सर्व घटनेला छेद देण्याचा प्रयत्न केला असून समाजाला मुली वाचवा असा एक संदेश देण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला असून या उपक्रमामुळे मुलींची गर्भात हत्या करणाऱ्या नराधमांना चांगलीच चपराक बसली आहे.  अशा पद्धतीने केलेल्या स्वागताचे मंगरुळसह परिसरातून कौतुक होत आहे. या स्वागता दरम्यान माळी परिवारासह मित्रपरिवार उपस्थित होते.

 
Top